धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध; हजारो आदिवासींचा उलगुलान मोर्चा
By संजय पाठक | Updated: October 12, 2023 14:23 IST2023-10-12T14:19:54+5:302023-10-12T14:23:33+5:30
नाशिक शहरातील तपोवनात साधूग्राम येथून या मोर्चाला सुरूवात झाली आहे

धनगर समाजाला आरक्षण देण्यास विरोध; हजारो आदिवासींचा उलगुलान मोर्चा
नाशिक - आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणात धनगर समाजाला आरक्षण देऊ नये यासह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी
संघटनांनी भव्य उलगुलान मोर्चा आज नाशिकमध्ये काढला आहे सुमारे दहा हजार आदिवासी बांधव यात सहभागी झाले आहेत.
नाशिक शहरातील तपोवनात साधूग्राम येथून या मोर्चाला सुरूवात झाली आहे. लाल झेंडे आणि फलक घेऊन सहभागी झालेले आदिवासी जेारदार घोषणा देत असून यात सर्व पक्षीय आदिवासी नेते सहभागी झाले आहेत. तपोवनातील हा मोर्चा निघाल्यानंतर सर्व प्रथम महिला असून त्यानंतर पुरूषांचा कार्यकर्ते
सहभागी झाले आहेत. रविवार कारंजा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहेत. मोर्चेकऱ्यांची संख्या लक्षात घेऊन पोलीसांनी मोर्चाच्या मार्गावरील सर्व वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे.