The opposition party's drum will not ring, it will explode - Girish Mahajan | VIDEO: विरोधी पक्षाचा ढोल वाजणार नाही, तर फुटणार - गिरीश महाजन
VIDEO: विरोधी पक्षाचा ढोल वाजणार नाही, तर फुटणार - गिरीश महाजन

नाशिक : लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपाला घवघवीत यश मिळणार आहे. विधानसभेत विरोधी पक्षाचा ढोल वाजणार नाही, तर फुटणार आहे, असा टोला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना लगावला आहे. 

शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत गिरीश महाजन उपस्थित होते. या मिरवणुकीत गिरीश महाजन यांनी ढोल वाजवून ठेका धरला. त्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणीत झाला. तसेच, गिरीश महाजन यांनी ढोल वाजवल्यानंतर पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी गणपती बाप्पा आम्हाला प्रसन्न आहे. चांगले काम करणाऱ्यांच्यामागे गणपती बाप्पा नेहमी राहतो. तो विघ्नहर्ता आहे. जो लोकसभेत चमत्कार घडला. तशाच प्रकारे विधानसभेतही घडणार आहे. याशिवाय विधानसभेत विरोधी पक्षाचा ढोल वाजणार नाही, तर फुटणार आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.

दरम्यान, रिमझिम पावसात सुरु असलेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत गिरीश महाजन यांच्यासह महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनाही सहभाग घेतला होता. 

Web Title: The opposition party's drum will not ring, it will explode - Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.