शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ विभाजनास आमदारांचा विरोध

By admin | Updated: January 31, 2016 23:30 IST

मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा : आरोग्य विद्यापीठ दुबळे करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्याचा सूर

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभाजनाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील आमदार आणि विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीदेखील याप्रकरणी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. केवळ नागपूरला विद्यापीठ असावे म्हणून काही महत्त्वाकांक्षी लोक मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे, तर कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठाचे विभाजन होऊ दिले जाणार नाही. याउलट आरोग्य विज्ञान विद्यापीठाला अधिक सक्षम करण्यासाठी निधी आणि पदे मंजूर करावीत अशी भूमिका आमदारांनी घेतली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे भूषण मानले जाते. विद्यापीठाने दिवसेंदिवस सुदृढ आणि सक्षम होत असताना विभाजनाचा मुद्या पुढे करण्यात आला आहे. वास्तविक नव्या विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा कितीतरी कमी निधी आरोग्य विद्यापीठाला देऊ केला, तर विद्यापीठातच आयुषसह सर्व फॅकल्टीचे चांगले काम होऊ शकते असा दावा विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केला आहे. केवळ राजकीय हेतूने विभाजनाचा निर्णय घेऊ नये अशी भावनाही कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविली. दरम्यान, यासंदर्भात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला असून, नाशिकची अस्मिता जपण्यासाठी विद्यापीठाचे विभाजन होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)