शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:39 AM

राज्य सरकारने बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या महाराष्टÑ नगररचना प्रशिमत संरचना धोरणाला मुदतवाढ देण्याची तरतूद केल्यानंतर नाशिक शहरात पुन्हा एकदा महापालिका मुदतवाढ देणार आहे.

नाशिक : राज्य सरकारने बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या महाराष्टÑ नगररचना प्रशिमत संरचना धोरणाला मुदतवाढ देण्याची तरतूद केल्यानंतर नाशिक शहरात पुन्हा एकदा महापालिका मुदतवाढ देणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात निर्णय घेतला असून, अधिकृतरीत्या प्रस्ताव मागविण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.  महापालिकेने यापूर्वी बेकायदेशीर बांधकामे नियमाधिन राहून नियमित करण्यासाठी ३१ पर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार २९२३ अर्ज प्राप्त झाले आहेत; परंतु आता शासनाने मुदतवाढ देण्याचे अधिकार आयुक्त आणि महासभेला दिले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्याचा वापर करून तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.  बेकायदेशीर पक्की बांधकामे कायदेशीर करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र नगररचना प्रशिमत संरचना धोरण २०१७ आखले आहे. त्यानुसार अनेक महापालिकांनी आपल्या सोयीनुसार संंबंधितांना प्रस्ताव दाखल करण्यासाठी मुदत दिली होती. नाशिकमध्ये ३१ पर्यंत मुदत होती. त्यात नगररचना विभागाकडे २९२३ प्रस्ताव दाखल झाले आहेत. गेल्या काही वर्षांत शहरात अनेक इमारतींची कपाट कोंडीमुळे अडचण झाली होती. अशा मिळकतींची संख्या जवळपास साडेसहा हजार इतकी आहे. तथापि, संपूर्ण कालावधीत एवढे अर्ज कमी आल्याने काहींनी या धोरणात अर्ज केले नसल्याचे स्पष्ट तर होतेच, परंतु मुदतवाढीची मागणी केली जात होती.  राज्य सरकारने त्यापूर्वी भिवंडी महापालिकेला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली असल्याने त्याच धर्तीवर सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. प्रस्ताव दाखल करण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर बुधवारी (दि.२०) नगरविकास विभागाने यासंदर्भात नवीन आदेश काढला.प्रकरणांचा हिशेब पावसाळ्यानंतरचकंपाउंडिंग स्कीम अंतर्गत महापालिकेत दाखल प्रकरणांची छाननी करण्यासाठी वर्षभराची मुदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आत्ताही दाखल प्रकरणात अशी मुदत देण्यात येणार आहे. तूर्तास पावसाळा सुरू असल्याने महापालिका निवासी इमारतींना हात लावणार नसून त्यामुळेच आता मुदतवाढ दिल्यास दाखल प्रकरणांचा हिशेब पावसाळ्यानंतरच होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे