ऑनलाईन परीक्षांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून १५ जुलैपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:57 PM2020-07-12T17:57:41+5:302020-07-12T18:00:53+5:30

विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परिक्षांसह नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ऑनलाईन परीक्षांसाठी यापूर्वी केलेल्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी एनटीएने विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत मुदत दिली आहे.

Opportunity for correction in examination application given by NTA | ऑनलाईन परीक्षांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून १५ जुलैपर्यंत मुदत

ऑनलाईन परीक्षांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून १५ जुलैपर्यंत मुदत

googlenewsNext
ठळक मुद्देऑनलाईन परीक्षांसाठी यापूर्वी केलेल्या अर्जात दुरुस्ती शक्यएनटीएने विद्यार्थ्यांना दिली १५ जुलैपर्यंत मुदत

नाशिक : एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने इग्नू पी. एचडी, ओपनमॅट एमबीए प्रवेशपरीक्षा, आयसीएआर एआयईईए, जेएनयूईई, यूजीसी नेट, सीएसआयआर यूजीसी नेट आणि एआयएपीजीईटी या परीक्षांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी अर्ज केला आहे, ते विद्यार्थी संबंधित  परीक्षांच्या पोर्टलवर जाऊन आपल्या अर्जात बदल करू शकणार आहेत. या दुरुस्तींसाठी अखेरची मुदत १५ जुलै २०२० आहे.
कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आॅनलाइन अर्जांमध्ये दुरुस्ती करताना समस्या आल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आॅनलाइन अर्जांमधील दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत ही दुरुस्ती करता येणार आहे.  विद्यार्थ्यांनी संबंधित परीक्षेच्या संकेतस्थळावर जाऊन अर्जांमध्ये आवश्यक असल्यास दुरुस्ती करू शकतील. त्यासाठीचा अधिक तपशील एनटीएने संकेस्थळावर दिला असून, विविध परीक्षांच्या संकेतस्थळाविषयीच्या महितीचाही यात समावेश आहे. दरम्यान, अतिरिक्त शुल्क भरण्याची गरज असेल तर त्यासाठीही अर्जात व्यवस्था करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयद्वारे शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

Web Title: Opportunity for correction in examination application given by NTA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.