Opportunity to apply for admission in Nashik city from Wednesday | नाशिक शहरात अकरावीसाठी बुधवारपासून प्रवेश अर्ज करण्याची संधी

नाशिक शहरात अकरावीसाठी बुधवारपासून प्रवेश अर्ज करण्याची संधी

ठळक मुद्देनाशकात ५९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश शहरात २३ हजार ९६० जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रियाविद्यार्थ्यांना बुधवारपासून प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची संधी

नाशिक : शहरातील ५९ उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुमारे २३ हजार ९६० जागांवर प्रवेशासाठी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना भाग एक भरता येणार आहे, तर गुरुवारपासून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जातील माहिती ऑनलाइन तपासून संबंधित मार्गदर्शन केंद्र, शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांतून तपासून घेता येणार आहे.
अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत सध्या विविध महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत झालेला बदल नोंदविण्यासाठी प्रक्रिया सुरू असून, ही प्रक्रिया १५ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यानंतर १६ जुलैला शहरातील अकरावीच्या उपलब्ध जागांची अंतिम निश्चित संख्या स्पष्ट होऊ शखणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच विद्यार्थ्यांना १५ जुलैपासून आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. दहावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. त्यापूर्वी १५ जुलैपर्यंत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची संकेतस्थळावर आॅनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे. याप्रक्रियेसाठी आता केवळ तीन दिवस उरले आहे. संबंधित मुख्याध्यापक तथा प्राचार्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, १६ जुलैपर्यंत नोंदणीकृत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती तपासून अंतिम करण्यात येणार आहे, तर विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने १५ जुलैपासून दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे व माहिती मान्यतेसाठी शाळा अथवा मार्गदर्शन केंद्राची निवड करणे, अर्जाला मान्यता मिळाल्याची खात्री करणे आदी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.  

 दहावीच्या निकालानंतर भाग दोन
दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार असून, त्यात महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवून संकेतस्थळावर अंतिम अर्ज सादर करता येणार आहे. दरम्यान, यावर्षी प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य ही फेर होणार नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Opportunity to apply for admission in Nashik city from Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.