शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियान प्रशिक्षणात संधी

By admin | Updated: August 19, 2016 00:13 IST

जिल्हा परिषद : दिल्ली येथे दोनदिवसीय शिबिर

नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत नवी दिल्ली येथे राष्ट्रीय दोनदिवसीय स्वच्छता शिबिरात राज्यातून नाशिक जिल्हा परिषदेला संधी मिळाली होती. या दोनदिवसीय प्रशिक्षण शिबिरात स्वच्छ भारतविषयक स्वच्छतेचे धडे देशभरातील जिल्हा परिषदांना देण्यात आले.राज्यातून एकमेव नाशिक जिल्हा परिषदेचा या स्वच्छता शिबिरात समावेश करण्यात आला होता. नाशिक शहरालगतच असलेल्या गोवर्धन येथील निर्मल ग्राम केंद्राची दखल घेऊन तेथील प्रचारक श्रीकांत नावरेकर यांनाही या प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आले होते. नाशिक जिल्हा परिषदेकडून अध्यक्ष विजयश्री चुंबळे व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. देशभरातील महाराष्ट्रासह झारखंड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, सिक्कीम, हरियाणासह अन्य राज्यांतील जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या प्रतिनिधींचा या शिबिरात समावेश होता. नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रमुख समन्वयक निपुण विनायक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सिक्कीम हे शंभर टक्के निर्मल ग्राम राज्य असून, हे राज्य देशातील सर्वाधिक सुंदर व स्वच्छ राज्य म्हणून ओळखले जाते. डोंगराळ प्रदेशाने नटलेल्या या राज्यात पर्यटकांची वर्दळ असूनसुद्धा राज्याने स्वच्छतेबाबत कठीण परिश्रम घेतल्याचे प्रशिक्षण शिबिरात सहभागी मार्गदर्शकांनी सांगितले. (प्रतिनिधी)