इगतपुरी शहरात क्रि केट स्पर्धेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:27 IST2019-02-10T22:49:01+5:302019-02-11T00:27:23+5:30
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन व इगतपुरी तालुका क्रीडा महोत्सव यांच्या वतीने लेदर (सीझन) बॉल २०-२० क्रि केट स्पर्धेचे आयोजन येथील रेल्वे ग्राउंड येथे करण्यात आले असून, शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

इगतपुरी येथे सीझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना सतीश यादव, अण्णा पार्टे, रमेश उबाळे, रवींद्र डावखर, अनिल वाकचौरे, उदय पंडित व संघ.
इगतपुरी : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन व इगतपुरी तालुका क्रीडा महोत्सव यांच्या वतीने लेदर (सीझन) बॉल २०-२० क्रि केट स्पर्धेचे आयोजन येथील रेल्वे ग्राउंड येथे करण्यात आले असून, शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सतीश यादव, सुनील आहेर, शशिकांत चौधरी, नंदू भागडे, अभियंता केदारे आदी मान्यवर उपस्थित होते. यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, लासलगाव, घोटी, मालेगाव, देवळाली, नाशिक, इगतपुरी अशा एकूण १६ संघांनी सहभाग घेतला असून, यात जिल्हा व राज्य पातळीवरील नामवंत खेळाडू येणार असल्याची माहिती अण्णा पार्टे, रमेश उबाळे, रवींद्र डावखर यांनी याप्रसंगी दिली.
या स्पर्धा आठ दिवस चालणार आहेत. दिवसभरात दोन सामने होणार आहे . तालुक्यातील आदिवासी भाग व जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळून त्यांचा नावलौकिक व्हावा हा उद्देश या स्पर्धेमागील असल्याचे आयोजकांनी सांगितले. विजयी संघाला प्रथम एकवीस हजार रोख पारितोषिक व चषक, द्वितीय अकरा हजार व चषक देण्यात येणार आहे. यावेळी अण्णा पार्टे, रवींद्र डावखर, रमेश उबाळे, विजय सोनवणे, राहुल पंडित आदी यावेळी उपस्थित होते.