शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांपासून बंद असलेला कानमंडाळे-धोडंबे रस्ता खुला

By admin | Updated: January 4, 2016 23:42 IST

लोकसहभाग : तीन किमीचा फेरा वाचणार

वडनेरभैरव : गेल्या २५ वर्षांपासून बंद असलेला कानमंडाळे-धोडंबे रस्ता प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार माणिक अहेर यांच्या उपस्थितीत लोकसहभागातून खुला करण्यात आला.शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत परिसरातील शेतकऱ्यांच्या वादातून सुमारे २५ वर्षांपासून अतिक्रमित असलेला रस्ता खुला करण्यात आला. १५ फूट रुंद व रस्त्याच्या दोन्ही बाजूने दोन फूट गटार असा सुमारे दोन किलोमीटर लांबीचा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खुला करण्यात आला.धोडंबे-कानमंडाळे डांबरी रस्त्याला जोडणारा हा शिवरस्ता खुला झाल्याने त्याचा दोन्ही गावातील शेतकरी व नागरिकांना फायदा होणार आहे. पिंपळगाव, वणी येथे शेतमालाची वाहतूक करताना कानमंडाळे गावातून जावे लागत होते. मात्र हा रस्ता खुला झाल्याने आता तीन किलोमीटर अंतराचा प्रवास वाचणार असून, शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण करण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर होणार आहे. प्रांताधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तहसीलदार माणिक अहेर यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार आर. एम. वाघ, वडनेरभैरवचे मंडल अधिकारी व्ही. वाय. भंडारी, धोडंबेचे तलाठी एस. एम. पगार, सरपंच संदीप काळे, उपसरपंच पोपट उशीर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रभाकर पवार आदिंसह धोडंबे, कानमंडाळे येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)