शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

केवळ उद्दिष्टपूर्तीचा अट्टहास

By admin | Updated: January 9, 2017 01:34 IST

अशास्त्रीय वृक्षारोपण : दहा फुटांच्या हजारो रोपांच्या लागवडीचा पालिकेने मांडला ‘देखावा’

अझहर शेख ल्ल नाशिक
दहा फुटांचे २१ हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिकेने निवडलेल्या कंपन्यांकडून आटापिटा केला जात आहे. शहरात जरी युद्धपातळीवर वृक्षारोपण केले जात असल्याचे दृश्य नाशिककरांच्या नजरेस पडत असले तरी हे दृश्य चिरकाल ‘हरित’ दिसणारे असेल का? याबाबत साशंकता आहे. कारण उद्दिष्टपूर्तीसाठी वृक्षारोपणाच्या शास्त्रीय पद्धतीला संबंधितांकडून छेद दिला जात आहे.
महापालिकेकडून शहरात २१ हजार रोपांच्या लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला गेला असून, त्यापैकी ११ हजार रोपे अवघ्या आठवडाभरातच लावून ठेकेदारांनी डोक्यावरचा भार खांद्यावर आणून ठेवला आहे; मात्र हा भार कमी करताना ज्या हेतुसाठी वृक्षारोपण केले जात आहे, किमान तो हेतू साध्य होणार का? याचा विचार संबंधितांनी केला नाही. शहराचे पर्यावरण टिकून रहावे आणि हरित नाशिक, स्वच्छ प्रदूषण मुक्त नाशिक’ निर्माण व्हावे, यासाठी पालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वृक्षारोपणासाठी कोट्यवधींचा खर्च उचलला आहे; मात्र ज्या पद्धतीने शहरात विविध भागांमध्ये अद्याप रोपांची लागवड करण्यात आली आहे ती पद्धत अत्यंत ‘क्रूर’ अशीच म्हणावी लागेल असे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे. जागेची अयोग्य निवड, रोपांभोवतालच्या प्लास्टिकच्या पिशव्यांसह लागवड, उच्च दाबाच्या वीजतारांखाली लागवड, रोपाच्या आकारापेक्षा दुप्पट आकाराचा ‘जेसीबी’ने केले जाणारे खड्डे, रिंगरोडच्या कडेला थेट पाथवेलाच खेटून खोदलेले खड्डे, रोपांभोवती आळे नाही, अशा थातूरमातूर व पूर्णत: चुकीच्या पद्धतीने क रण्यात आलेल्या या वृक्षारोपणामुळे २१ हजारांपैकी किती रोपांचे वृक्षांमध्ये रूपांतर होईल, हा आगामी काळात संशोधनाचा विषय ठरणार आहे. महापालिकेने संबंधित ठेकेदारांना योग्य समज देऊन शास्त्रीयदृष्ट्या वृक्ष लागवडीची अट बंधनकारक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.