शहरं
Join us  
Trending Stories

नाशिक जिल्ह्यात मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 01:00 IST

कोरोना संकटामुळे राज्य शासनाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अनुकरण करीत राज्य शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या जाणारी शालांत परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने गुणदान करून दहावीचा निकाल शुक्रवारी (दि.१६) जाहीर केला. यात नाशिक जिल्ह्यातून परीक्षेला प्रविष्ट ९२ हजार २३६ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९२ हजार २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ४९ हजार ४२७ मुले (९९.९६ टक्के) व ४२ हजार ४८३ (९९.९७) मुलींचा समावेश असून, नेहमीप्रमाणे यावर्षीही उत्तीर्णतेच्या प्रमाणात मुलींनीच बाजी मारली आहे.

ठळक मुद्देकोरोना पावला : ९२ हजार २१० विद्यार्थी उत्तीर्ण

नाशिक : कोरोना संकटामुळे राज्य शासनाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अनुकरण करीत राज्य शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या जाणारी शालांत परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने गुणदान करून दहावीचा निकाल शुक्रवारी (दि.१६) जाहीर केला. यात नाशिक जिल्ह्यातून परीक्षेला प्रविष्ट ९२ हजार २३६ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ९२ हजार २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ४९ हजार ४२७ मुले (९९.९६ टक्के) व ४२ हजार ४८३ (९९.९७) मुलींचा समावेश असून, नेहमीप्रमाणे यावर्षीही उत्तीर्णतेच्या प्रमाणात मुलींनीच बाजी मारली आहे.

राज्य माध्यमितक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांचा नववीचा अंतिम निकाल व दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन आदींच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना गुणदान करण्यात आल्याने यावर्षी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झालेले जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर २६ विद्यार्थ्यांचा निकाल तांत्रिक कारणाने राखून ठेवण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे, अशा विद्यार्थ्यांच्या गुणदान प्रक्रियेतील तांत्रिक उणिवांविषयी शासनस्तरावर निर्णय झाल्यानंतर त्याचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, या निकालानंतर कोणीही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला नाही. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना कोरोनाच पावलाची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहे.

श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

विशेष प्रावीण्य- ३४,०१३

प्रथम श्रेणी- ४३,५५२

द्वितीय श्रेणी- १४,३१२

उत्तीर्ण श्रेणी- ३६३

 

इन्फो-

 

नाशिक जिल्ह्याचा असा राहिला निकाल

वर्ष - परीक्षा केंद्र - प्रविष्ट - उत्तीर्ण - प्रमाण

२०१७ - १८८ - ९१,१७९ - ७९,७१० - ८७.४२

२०१८ - १९५ - ९०,२३८ - ७९,८७२ - ८८.४७

२०१९ - १९६ - ९०,६५६ - ७१,४८७ - ७८.८६

२०२० - १९६ - ८९,०७८ - ८४,५५८ - ९४.९३

२०२१ - ०००- ९२,२३६ - ९२,२१० - ९९.९७

 

हिंदी प्रथम भाषेचा शंभर टक्के निकाल

नाशिक जिल्ह्याचा निकाल ९९ टक्क्यांहून अधिक लागला असून, विद्यार्थ्यांनी विषयनिहायही लक्ष्यवेधी गुण संपादित केले आहेत. यंदा हिंदी प्रथम विषयात सर्व शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर इंग्रजी प्रथम भाषा विषयात ९९.९९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सामाजिकशास्त्रमध्ये व मराठी द्वितीय, तृतीय ९९.९७, विज्ञान ९९.९६, उर्दू प्रथम भाषा ९९.९५, गणित ९९.९३, तर इंग्रजी द्वितीय व तृतीय, हिंदी द्वितीय व तृतीय, तसेच मराठी प्रथम भाषा विषयात ९९.९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकSSC Resultदहावीचा निकाल