नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा पाच टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 18:35 IST2019-06-24T18:35:29+5:302019-06-24T18:35:45+5:30
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघे ७२ टक्के पाणी साठले होते. या पाण्यावरच पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी पाण्याचे आरक्षण टाकण्यात आले.

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा पाच टक्के साठा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कडाक्याचे ऊन व लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेत पाच टक्के जलसाठा शिल्लक राहिला असून, पंधरा धरणांनी तळ गाठल्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना जिल्हावासीयांना करावा लागत आहे. नाशिक शहरासह मराठवाडा, नगर या जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अवघे ७२ टक्के पाणी साठले होते. या पाण्यावरच पाणीपुरवठा योजना व सिंचनासाठी पाण्याचे आरक्षण टाकण्यात आले. शिवाय मराठवाडा, नगर या जिल्ह्यांचे आवर्तनही सोडण्यात आले. जानेवारी महिन्यांपासून जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने धरणातून पाणी सोडण्याची वेळ आली, शिवाय कडक उन्हाळा सुरू झाल्याने धरणाच्या पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने झाले. जूनच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत मान्सून लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाच टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. गंगापूर धरणात १५ टक्के जलसाठा असून, समूहात १० टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सहा टक्क्याने जलसाठा घटला आहे.