आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून आॅनलाइन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:28 IST2019-02-10T21:23:27+5:302019-02-11T00:28:02+5:30

र्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांनाही इंग्रजी शाळांमध्ये शिकता यावे, यासाठी मोफत २५ टक्के प्रवेश दिले जातात. या प्रक्रियेसाठी २५ फेब्रुवारीपासून प्रवेश अर्ज आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी दिली आहे.

Online Registration for RTE from Feb 25 | आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून आॅनलाइन नोंदणी

आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून आॅनलाइन नोंदणी

ठळक मुद्देखर्डे : आर्थिक दुर्बल घटकांना २५ टक्के मोफत प्रवेश

खर्डे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांनाही इंग्रजी शाळांमध्ये शिकता यावे, यासाठी मोफत २५ टक्के प्रवेश दिले जातात. या प्रक्रियेसाठी २५ फेब्रुवारीपासून प्रवेश अर्ज आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे,
अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी दिली आहे.
पालकांचा इंग्रजी शाळांकडे कल वाढू लागला असून, त्याच प्रमाणात इंग्रजी शाळांची संख्याही वाढू लागली आहे. आर्थिक कुवत असणारे पालक आपल्या पाल्यांना अशा शाळांमध्ये दाखल करीत आहेत; परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असलेले
पालक आपल्या पाल्यांना इच्छा
असूनही अशा शाळांमध्ये दाखल करू शकत नाहीत. हाच प्रश्न लक्षात
घेऊन शासनाने आर्थिकदृष्ट्या
दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी अशा शाळांमध्ये मोफत २५ टक्के प्रवेश देण्यासाठीची योजना आखली आहे.
या प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी प्रवेश अर्ज आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. जानेवारीपासून या शाळांची नोंदणी सुरू होऊन ही प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, २५ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष प्रवेशासाठी अर्ज
करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात येणार आहे.
२३४ीिल्ल३.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या साइटवर जाऊन नोंदणी करायची आहे.
दाखल होणाऱ्या नोंदणी अर्जातून सोडतीद्वारे विद्यार्थ्यांच्या शाळा निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी दि. १४ मार्च रोजी पहिली सोडत काढण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक सोडतीनंतर उर्वरित जागा, शाळेची नावे आॅनलाइन दिसणार आहेत.





पालकांना नजीकच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहेत.

Web Title: Online Registration for RTE from Feb 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.