सायखेडा केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 16:51 IST2020-07-28T16:49:26+5:302020-07-28T16:51:05+5:30

सायखेडा : कोरोना रोगाच्या वाढता पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.

Online education conference of Saykheda Kendra successful | सायखेडा केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद यशस्वी

सायखेडा केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद यशस्वी

ठळक मुद्देयेणाऱ्या तांत्रिक अडचणीवर चर्चा करण्यात आली.

सायखेडा : कोरोना रोगाच्या वाढता पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र बंद नाही मुलांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षकांची शैक्षणिक कामे बंद नाही शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती.
सायखेडा केंद्राची शिक्षण परिषद झूम अ‍ॅपद्वारे आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख ओंकार वाघ होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी कैलास बोरसे तसेच तंत्रस्नेही सचिन गुंजाळ, विनायक लटपटे, माणिक मुरकुटे यांनी मार्गदर्शन केले.
मुलांना आॅनलाइन शिक्षण पद्धतीने शिक्षक दररोज अध्ययन अध्यापन करत असतात, त्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणीवर चर्चा करण्यात आली. पटनोंदणी, पाठ्यपुस्तक वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच विविध योजना संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे बोरसे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकर यांचा शिक्षकांना प्रेरणा देणारा आणि काळजी विषयी संदेश देणारा व्हिडीओ ऐकविण्यात आला.
या वेळी आॅनलाईन अध्यापन पद्धती शिक्षक कशा प्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवत आहे, त्यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत शिक्षक नाठे,गांगुर्डे,पिंगळे,सुडके, कमानकर यांनी सहभाग घेतला.
कार्यक्र माचे प्रास्ताविक आणि प्रशासकीय सूचना केंद्र कुमकर वाघ यांनी दिलेल्या आॅनलाइन शिक्षण परिषदेचे शिक्षणाधिकारी केशव कुंभार कार्यक्र माचे प्रास्ताविक केले.
(फोटो २८ सायखेडा)

Web Title: Online education conference of Saykheda Kendra successful