कांदाप्रश्न राष्टÑवादीकडून हायजॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 01:06 AM2019-10-13T01:06:32+5:302019-10-13T01:07:03+5:30

नाशिक : कांद्याच्या निर्यातबंदीने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाल्याची भावना लक्षात घेऊन जिल्ह्याच्या दौऱ्यावर निवडणूक प्रचारार्थ आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र ...

Onion Nation 1 Hijacked by Plaintiff | कांदाप्रश्न राष्टÑवादीकडून हायजॅक

कांदाप्रश्न राष्टÑवादीकडून हायजॅक

Next
ठळक मुद्देशेतकरी मतांकडे लक्ष; कांदा उत्पादक भागातच शरद पवार यांच्या सभांचे नियोजन

नाशिक : कांद्याच्या निर्यातबंदीने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाल्याची भावना लक्षात घेऊन जिल्ह्याच्या दौऱ्यावर निवडणूक प्रचारार्थ आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्यातबंदी उठविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचे आश्वासन देऊन कांदा उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला असतानाच, दरदिवशी कांद्याचे गडगडत असलेले दर लक्षात घेता राष्ट्रवादीने नाशिक जिल्ह्याच्या प्रचारात कांद्याची निर्यातबंदी व कोसळणाºया दराचा मुद्दाच प्रचारात आणण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच जिल्ह्याच्या दौºयावर येत असलेले पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभांचे आयोजन कांदा पिकविणाºया तालुक्यातच करण्यात आले आहे.
निवडणुका कोणत्याही असल्या तरी, प्रत्येक निवडणुकीत कांद्याचे चढलेले वा गडगडलेले दर हे सत्ताधारी व विरोधकांसाठी डोकेदुखी ठरत आले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कांद्याने पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत दर खाल्ल्यानंतर खुल्या बाजारात कांदा ७० ते ८० रुपये किलोने विक्री केला गेला. परिणामी देशपातळीवर सरकारच्या विरोधात ग्राहकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात करताच, केंद्र सरकारने तातडीने पथक पाठवून कांदा भाववाढीची कारणे जाणून घेतली व तत्काळ कांद्यावर निर्यांतबंदी लादून व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली.
परिणामी त्यानंतर कांद्याचे दर कोसळण्यास सुरुवात झाली. कांद्याची निर्यातबंदी लादून ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेतल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सत्तारूढांनी चालविला असतानाच, दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकºयांनी सरकारच्या निर्णयाविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यास सुरुवात केली. आजही गावोगावच्या कांदा उत्पादकांमध्ये सरकारच्या निर्णयाविरुद्ध नाराजी असून, व्यापाºयांवरही कांदा साठवणुकीवर निर्बंध असल्यामुळे त्यांनी कांद्याची खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे कांद्याचे दर चक्क दोन ते अडीच हजार रुपयांनी घसरले आहेत. कांदा उत्पादकांच्या नाराजीचा निवडणुकीत फटका बसण्याच्या शक्यतेने मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारला साकडे घालण्याचे आश्वासन निवडणूक प्रचारात दिले आहे; परंतु त्यावर शेतकरी कितपत विश्वास ठेवतील ही शंकाच आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीने हा मुद्दा निवडणूक प्रचारात अग्रक्रमाने आणला आहे.
कांद्याचे राजकारण रंगण्याची चिन्हे
नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कांद्यासंदर्भात सरकारने घेतलेले निर्णय कामी आले असून, या आठवड्यात शरद पवार जिल्ह्याच्या दौºयावर येत असताना पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार येवला, निफाड व दिंडोरी अशा तीनच ठिकाणी पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते; परंतु दिवसेंदिवस कांद्याच्या निर्यातबंदीमुळे कोसळत असलेले दर पाहता, कांदा उत्पादकांची सहानुभूती मिळविण्यासाठी आता कांद्याची बाजारपेठ असलेल्या उमराणे, चांदवड, पिंपळगाव बसवंत, नांदगाव या ठिकाणी शरद पवार यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्याचे ठरले आहे. यातून कांद्याचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Onion Nation 1 Hijacked by Plaintiff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.