बाळासाहेब थोरातांकडून कांदा दरवाढीचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 01:40 AM2019-12-07T01:40:40+5:302019-12-07T01:41:11+5:30

अवकाळी पावसामुळे कांद्याची टंचाई निर्माण झाली. शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसताना कांद्याचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांना दोन जादाचे पैसे मिळत असले तरी, ग्राहकांनाही कमी दरात कांदा कसा उपलब्ध होईल, याचा विचार सरकार पातळीवर सुरू झाला असून, स्वस्तात कांदा देण्यासाठी केंद्रे सुरू करता येतील काय याचाही शासन पातळीवर विचार करून पहावा लागेल, अशा शब्दात राज्याचे कॅबिनेट मंत्री व कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कांदा दरवाढीचे समर्थन केले.

Onion hike support from Balasaheb Thorata | बाळासाहेब थोरातांकडून कांदा दरवाढीचे समर्थन

बाळासाहेब थोरातांकडून कांदा दरवाढीचे समर्थन

Next
ठळक मुद्देग्राहकांनाही स्वस्त दराने मिळावा : केंद्र सुरू करण्याचा विचार

नाशिक : अवकाळी पावसामुळे कांद्याची टंचाई निर्माण झाली. शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसताना कांद्याचे भाव वाढले
आहेत. शेतकऱ्यांना दोन जादाचे पैसे मिळत असले तरी, ग्राहकांनाही कमी दरात कांदा कसा उपलब्ध होईल, याचा विचार सरकार पातळीवर सुरू झाला असून, स्वस्तात कांदा देण्यासाठी केंद्रे सुरू करता येतील काय याचाही शासन पातळीवर विचार करून पहावा लागेल, अशा शब्दात राज्याचे कॅबिनेट मंत्री व कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कांदा दरवाढीचे समर्थन केले.
नाशिक दौºयावर आलेल्या थोरात यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधताना उपरोक्तमत व्यक्तकेले. ते पुढे म्हणाले, आज कांद्याचे भाव वाढले असले तरी, येत्या तीन ते चार महिन्यांत हाच कांदा मातीमोल भावात शेतकºयांना विकावा लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होईल ही वस्तुस्थितीही नाकारून चालणार नाही. त्यामुळे ग्राहकाला स्वस्त दरात कांदा मिळावा व कांदा मातीमोल भावात विकला जाईल. तेव्हा शेतकºयाच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका सरकारला घ्यावी लागणार आहे. कांद्याच्या दरवाढीवर उतारा म्हणून परदेशातून कांदा आयात केला जात असेल व शेतकºयालाही चांगला बाजारभाव मिळणार असेल तर काहीच हरकत नसल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले.
अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या शेतीपिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, काही शेतकºयांना काही प्रमाणात मदत प्राप्त झाली आहे. अन्य शेतकºयांना लवकरात लवकर मदत देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. हैदराबाद येथील महिला पशुवैद्यकीय अधिकाºयावर बलात्कार करणाºया आरोपींचा एन्काउंटर करण्यात आल्याच्या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांनी आरोपींनी केलेले कृत्य अतिशय हीन व निंदनीय असेच होते, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी सर्वांची भावना होती. अशा परिस्थितीत त्यांचा एन्काउंटर
झाला असेल तर तो कोणत्या परिस्थितीत झाला हे पहावे लागेल, असे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर उपस्थित होते.
नव्यांना विचारूनच जुन्यांना प्रवेश
विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉँग्रेस पक्ष सोडून गेलेले पदाधिकारी दुसºया पक्षात अस्वस्थ व व्यथित असल्याने त्यांना कॉँग्रेस पक्षात प्रवेश देण्याची होणारी चर्चा खरी असली तरी त्यांना लगेच पक्षात घेतले जाणार नाही असे सांगून थोरात यांनी, अशा पदाधिकाºयांना काही दिवस व्यथितच राहू द्या. कारण ते गेल्यावर पक्षात नवीन कार्यकर्ते व पदाधिकारी तयार झाले आहेत. या नवीन कार्यकर्त्यांना विचारात घेतल्याशिवाय जुन्यांना पक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे सांगितले.

Web Title: Onion hike support from Balasaheb Thorata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.