चाळीतून कांदा थेट उकिरड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:42 IST2019-01-13T01:41:55+5:302019-01-13T01:42:39+5:30

उन्हाळ कांद्याचे कोसळलेले बाजारभाव, चाळीतील सडलेल्या कांद्यामुळे झालेले आर्थिक नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडलेले असतानाच आता चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणणे देखील परवडेनासे झाल्यामुळे कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Onion fades directly from the chawl | चाळीतून कांदा थेट उकिरड्यावर

चाळीतून कांदा थेट उकिरड्यावर

देवळा : उन्हाळ कांद्याचे कोसळलेले बाजारभाव, चाळीतील सडलेल्या कांद्यामुळे झालेले आर्थिक नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडलेले असतानाच आता चाळीतील कांदा बाजारात विक्रीसाठी आणणे देखील परवडेनासे झाल्यामुळे कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
देवळा तालुक्यातील अनेक शेतकºयांनी चाळीतील कांदा उकिरड्यावर टाकून दिला आहे. पोळ कांद्याची आवक सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यामुळे त्याचेदेखील बाजारभाव कोसळले आहेत, यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांच्या मागे लागलेली साडेसाती संपायचे नाव घेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. चाळीतील उन्हाळ कांद्याचे जागेवर पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व पोळ कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे. सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत गतवर्षी उन्हाळी कांद्याचे विक्रमी उत्पादन निघाल्यानंतर चांगला भाव मिळेल या मोठ्या अपेक्षेने कांदा उत्पादक शेतकºयांनी हा कांदा चाळीत साठवून ठेवला होता. प्रत्येक शेतकºयाकडे स्वत:ची कांदा चाळ तयार झाली. यामुळे सर्व शेतकºयांनी कांदा चाळीत साठवणूक करण्यावर भर दिला.

Web Title: Onion fades directly from the chawl