वणीतून कांदा कंटेनर इटलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 14:09 IST2019-02-01T14:09:20+5:302019-02-01T14:09:30+5:30
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वणी येथील सप्तश्रृंगी फार्मर प्रोड्युसर लिमिटेड कंपनीच्यावतीने नासिक जिल्ह्यातून प्रथमच कांदा कंटेनर इटली येथे पाठविण्यात आला आहे.

वणीतून कांदा कंटेनर इटलीत
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वणी येथील सप्तश्रृंगी फार्मर प्रोड्युसर लिमिटेड कंपनीच्यावतीने नासिक जिल्ह्यातून प्रथमच कांदा कंटेनर इटली येथे पाठविण्यात आला आहे. इटली येथील व्यापारी इझलीन कावा यांनी नासिक जिल्ह्यातील अंदाजे ६५ एमएम साइजचा २४० क्विंटल कांदा खरेदी केला आहे. भविष्यात जानोरी कार्गो हब एअरपोर्टमधुन गुलाबाची फुले, बासमती तांदूळ व डाळिंब, पेरु यासारखे उत्पादने निर्यातीसाठी परिपुर्ण मदत करणार असुन एअरपोर्ट कार्गो मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जानोरी परिसरातील शेतकऱ्यांची गुलाब फुले अहमदाबाद व दिल्लीत दोन तासात मार्केटिंगला पोहचविण्यात येणार आहे. शेतकरी हा भारताचा आर्थिक कणा असून त्याची प्रगती व्हावी हाच ध्यास असल्याचे जमधडे व सिंग यांनी सांगितले. सप्तश्रृंगी फार्मर प्रोड्युसर लिमिटेड कंपनीचे संदीप जावळे, रोशन जाधव, दिंडोरी तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांच्या मार्गदर्शनाखाली जानोरी नासिक एअर कार्गोचे सिंग यांच्या सहकार्याने नासिक जिल्ह्यातील हा कांदा कंटेनर रवाना करण्यात आला. यावेळी सुनील घुमरे, कृषी अधिकारी जमधडे, कृषी सहाय्यक मनिषा पाटील यांचेसह कागाचे व फुड प्रोड्युसर कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.