Onion conference of farmers association will be held at Chandwad on March 7 - Anil Ghanavat | 'निर्यातबंदी उठल्यानंतरही चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद होणारच'

'निर्यातबंदी उठल्यानंतरही चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद होणारच'

नाशिक - केंद्रीय अन्नमंत्र्यांनी कांदा निर्यातबंदी उठवुण्याची घोषणा केली असली तरी ती कायमस्वरुपी नाही, व कांद्यावरील इतर निर्बंध कायमचे हटवून कांदा व्यापारातील सरकारी हस्तक्षेप थांबवावा ही शेतकरी संघटनेची भुमिका आहे. या विषयावर  शेतकर्यांशी चर्चा करुन अंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी १ मार्च रोजी चांदवड येथे कांदा परिषद आयोजित केली असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

कांद्याचे दर नियंत्रीत करण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद केली, साठ्यावर मर्यादा घातली व परदेशातुन कांद्याची आयात ही केली आहे. आता कांद्याचे नविन पिक बाजारात आले आहे व कांद्याचे भाव कोसळत आहेत. या पार्श्वभुमीवर कांद्याची निर्यात खुली करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. निर्यातबंदी हटविण्याची घोषणा झाल्यामुळे कांदा दरातील घसरण सध्या थांबणार आहे. परंतू ही निर्यातबंदी किती काळापुरती आहे, किती टन मर्यादे पर्यंत आहे, कोणत्या जातीच्या कांद्यासाठी आहे, निर्यात शुल्क किती आकारले जाणार, साठ्यांवरील बंधनाचे काय? या बाबी स्पष्ट नाहीत.               आज कांद्यावरील निर्यातबंदी उठवली तरी प्रत्यक्षात करार होउन  निर्यात सुरु होण्यास किमान एक महिण्य‍चा कालावधी लागेल. भारत सरकारच्या धरसोडीच्या धोरणामुळे कांदा निर्याती बाबत आपण अंतरराष्ट्रीय बाजारात विश्वासहार्यता गमावुन बसलो आहोत. ती संपादन करण्यासाठी कायमस्वरुपी निर्यातीचे धोरण अवलंबणे गरजेचे आहे.

सरकार ग्रहकांच्या हितासाठी शेतकरी विरोधी धोरणे राबवीत आसते मात्र शेतकर्यांना जाणिव पुर्वक कर्जाच्या खाईत ढकलत आहे. सध्या जगभरात कांद्याचे बाजार चढे आहेत, मागणी आहे परंतू निर्यातबंदी असल्यामुळे ही संधी हातची जात आहे. कांदा निर्यातीतुन भारताला एका वर्षात सुमरे  ३००० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते त्याला देश मुकत आहे. कांद्याच्या भावाचा परिणाम फक्त शेतकर्यावरच नाही तर कांदा उत्पादक परिसरातील सर्व व्यवसाइकांवर होतो याचा विचार करुन इतर व्यवसाइंकांनी सुद्धा या परिषदेत उपस्थित राहुन आपली मते मांडावीत. चांदवड येथे होणार्या कांदा परिषदेत कांदा पिक, व्यापार, साठवणुक, निर्यात व शासनाचे धोरण या विषयावर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. सह्याद्री फार्मर प्रड्युसर कंपनीचे अध्यक्ष, विलासराव शिंदे, कांदा उतपादक शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष भारत दिघोळे, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख कुबेर जाधव, प. महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या अध्यक्षा सीमाताई नरोडे, आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्या अध्यक्षतेखाली कांदा परिषद होणार आहे. १ मार्च रोजी होणार्या कांदा परिषदेला शेतकर्यांनी मोठ्या संख्ये उपस्थित रहावे असे आवाहन शेतकरी संघटना उपाध्यक्ष देविदासअण्णा पवार, नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अर्जुनतात्या बोराडे, स्व. भा. पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर पुरकर, चांदवड तालुका  स्व. भा. पक्ष अध्यक्ष अनंत सादडे, त्रिंबक गांगुर्डे यांनी केले आहे.

Web Title: Onion conference of farmers association will be held at Chandwad on March 7 - Anil Ghanavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.