सिडकोत भरदिवसा चाकूने भोसकून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:16 IST2021-02-13T04:16:23+5:302021-02-13T04:16:23+5:30

सिडको : मैत्रिणीची छेडछाड करून तिला शिवीगाळ केल्याचा राग आल्याने, मित्राला सोबत घेत धारदार शस्त्रांने भोसकून भरदिवसा युवकाचा ...

One was stabbed to death in CIDCO all day | सिडकोत भरदिवसा चाकूने भोसकून एकाचा खून

सिडकोत भरदिवसा चाकूने भोसकून एकाचा खून

सिडको : मैत्रिणीची छेडछाड करून तिला शिवीगाळ केल्याचा राग आल्याने, मित्राला सोबत घेत धारदार शस्त्रांने भोसकून भरदिवसा युवकाचा खून केल्याची घटना सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम येथे शुक्रवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास घडली. योगेश प्रकाश तांदळे ( २७, रा. पंडितनगर ) असे मयत युवकाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राजे संभाजी स्टेडियम येथे दोन युवक त्यांच्या मैत्रिणीसमवेत गप्पा मारत बसले होते. याच दरम्यान दुपारी अडीच वाजेच्या सुमारास स्टेडियमवर योगेश तांदळे हा युवक मद्य पिऊन त्याचे मित्र उमेश पाटील व गौरव भोये यांच्या समवेत बसलेला होता. योगेश याने एका युवकाच्या मैत्रिणीची छेड काढण्याचा तसेच शिवीगाळ केल्याने बसलेल्या तरुणांना राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी मैत्रिणीला घरी सोडून पुन्हा स्टेडियम गाठले. याठिकाणी योगेश तांदळे भेटल्याने त्यांनी धारदार शस्त्राने भोसकून योगेशचा खून करीत घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळतात पोलीस उपायुक्त विजय खरात यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करून तपासाची चक्रे फिरवून अवघ्या दोन तासांतच पोलिसांनी संशयित राहुल माळोदे ( रा. पाथर्डी फाटा) व आदित्य सुतार (रा.लेखानगर) यांना ताब्यात घेतले असून, या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

===Photopath===

120221\12nsk_49_12022021_13.jpg

===Caption===

सिडकोतील खूनाच्या प्रकरणातील संशयितांसमवेत पोलीस अधिकारी व कर्मचारी

Web Title: One was stabbed to death in CIDCO all day