म्हसरूळला एक लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 01:20 IST2021-04-05T01:18:58+5:302021-04-05T01:20:02+5:30
एक लाख ८२ हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना काल शनिवारी रात्री दीड वाजता सुमारास म्हसरूळ शिवारात घडली आहे.

म्हसरूळला एक लाखांची घरफोडी
पंचवटी : एक लाख ८२ हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना काल शनिवारी रात्री दीड वाजता सुमारास म्हसरूळ शिवारात घडली आहे.
या घरफोडी प्रकरणी पुणे येथे राहणाऱ्या रूचिरा मयुर जैन यांनी तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी जैन म्हसरूळ शिवारातील दिंडोरीरोड असलेल्या गीता नगर येथे आलेल्या होत्या. शनिवारी रात्री गीता लक्ष्मी अपार्टमेंट येथे खोलीत सर्वजण झोपलेले असताना चोरट्याने स्लाइडिंग खिडकीतून हात टाकत कशाच्या तरी सहाय्याने बेडरूम मध्ये ठेवलेली पर्स चोरून नेली. त्या पर्समध्ये साडेपाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल फोन असा सुमारे १ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.