उभ्या वाहनाला धडकून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 22:21 IST2021-12-29T22:21:04+5:302021-12-29T22:21:35+5:30

चांदवड : खडकजांब शिवारात उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिल्याने एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

One killed in vertical vehicle collision | उभ्या वाहनाला धडकून एक ठार

उभ्या वाहनाला धडकून एक ठार

ठळक मुद्देपोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला

चांदवड : खडकजांब शिवारात उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिल्याने एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

मुंबई - आग्रा रोडवर चांदवड ते नाशिक जाणाऱ्या लेनवर खडकजांब शिवारात हॉटेल मनमयूरसमोर २७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आयशर क्रमांक एम.एच.०४ / डी.एस. ९२७० चे चालक नाव, गाव माहीत नाही. हे नाशिकबाजूकडे आयशरच्या खाली जॅक लावून कोठे तरी निघून गेले. त्यावेळी नाशिककडून जाणारी दुचाकी क्रमांक एम.एच. १५ / एच.डी. २४७९ चे चालक आयशरच्या पाठीमागील टायरजवळ आदळून अपघात झाला. यात दुचाकी चालक मयूर नामदेव पोटे (२१, रा. भाटगाव, ता. चांदवड) हा मरण पावला तर त्याच्या मागे बसलेला शुभम शरद जगताप हा गंभीर जखमी झाला, अशी फिर्याद वडनेरभैरव पोलीस स्टेशनला नामदेव सजन पोटे, रा. भाटगाव, ता. चांदवड यांनी दिल्याने पोलिसांनीअपघाताचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस नाईक व्ही.एन. घुमरे तपास करीत आहेत.

Web Title: One killed in vertical vehicle collision