राहुड घाटात दोन दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 22:51 IST2020-07-02T20:38:17+5:302020-07-02T22:51:51+5:30
चांदवड : मुंबई - आग्रा महामार्गावर राहुड घाटात दुचाकीला मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

राहुड घाटात दोन दुचाकी अपघातात एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : मुंबई - आग्रा महामार्गावर राहुड घाटात दुचाकीला मागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
नाशिक येथील सोपान हिलाल महाजन (३४) व त्यांचे सासरे रघुनाथ माळी हे दोघेही गुरुवारी (दि. २५) सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच १५ एआर ८०३३) मालेगाव येथे नातेवाइकांच्या विवाह समारंभासाठी जात असता राहुड घाटात त्यांच्या दुचाकीला मागून येणाºया दुचाकीने (एमएच १८ बीएफ ७४२४) धडक दिल्याने
झालेल्या अपघातात मागे बसलेले रघुनाथ माळी हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यात जबर मार लागला तर सोपान महाजन हा किरकोळ जखमी झाला आहे.
त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रघुनाथ माळी यांना मृत घोषित केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.