मेशीजवळ दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:14 IST2020-08-19T21:27:34+5:302020-08-20T00:14:56+5:30
लोहोणेर : मेशी-सौंदाणे-देवळा रस्त्यावर दुचाकीच्या अपघातात फुलेनगर वासोळ पाडे, ता. देवळा येथील प्रतिष्ठित शेतकरी, वासोळ सोसायटीचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बाळू महादू खैरनार (५७) यांच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने निधन झाले.

मेशीजवळ दुचाकी अपघातात एक ठार
लोहोणेर : मेशी-सौंदाणे-देवळा रस्त्यावर दुचाकीच्याअपघातात फुलेनगर वासोळ पाडे, ता. देवळा येथील प्रतिष्ठित शेतकरी, वासोळ सोसायटीचे माजी अध्यक्ष ह.भ.प. बाळू महादू खैरनार (५७) यांच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने निधन झाले. बाळू खैरनार दुपारी साडेतीन वाजता उमराणेकडून दुचाकीने फुलेनगरकडे येत असताना धोबीघाट येथे दुचाकी घसरून अपघात झाला. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी मालेगाव येथे दाखल केले होते. परंतु अधिक रक्तस्राव झाल्याने त्यांना नाशिक येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. फुलेनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना खैरनार यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.