एसटी-दुचाकीच्या अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:54 IST2020-11-16T00:54:00+5:302020-11-16T00:54:56+5:30
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या जुन्या पुणे महामार्गावरील हॉटेल आदितीजवळ एसटीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने जखमी झालेल्या एकाचे शनिवारी (दि.१४) नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

एसटी-दुचाकीच्या अपघातात एक ठार
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या जुन्या पुणे महामार्गावरील हॉटेल आदितीजवळ एसटीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने जखमी झालेल्या एकाचे शनिवारी (दि.१४) नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
बायपासवरील शेळके वस्तीवर राहणारे नवनाथ अमृता शेळके (४२) हे शुक्रवारी (दि.१३) सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान दुचाकीने गावाकडून वस्तीकडे निघाले होते. आदिती हॉटेलजवळ समोरून येणाऱ्या बसने दुचाकीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या नवनाथ यांना तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी (दि.१४) दुपारी त्यांचा मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. ऐन दिवाळी सणाच्या दिवशी नवनाथ यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत वावी पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.