पिकअप-कार धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 15:02 IST2019-10-11T15:01:53+5:302019-10-11T15:02:02+5:30
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर घोटीच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने त्याच दिशेने जाणाºया स्विफ्ट कारला पाठीमागुन जोराची धडक दिली.

पिकअप-कार धडकेत एक ठार
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर घोटीच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने त्याच दिशेने जाणाºया स्विफ्ट कारला पाठीमागुन जोराची धडक दिली. यात घोरवड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष दगू गेणू हगवणे (६०) ठार झाले. चालक रवींद्र गंगाधर हगवणे(४३), ज्ञानेश्वर गिते हे जखमी झाले. पिकअपसह कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारात घोरवड घाटीतील हॉटेल साईसमोर हा अपघात झाला. जखमींनी नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत हगवणे यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.