मोटरसायकल अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:52 IST2021-02-23T21:23:28+5:302021-02-24T00:52:45+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरातील चिंचखेड रोड डाव्या पालखेड कालवा शिवारात भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरून पडून अपघातात गंभीर जखमी झालेल्या जालिंदर मधुकर वाघ (वय ४७, रा. संतोषी माता नगर) यांचा मंगळवारी (दि. २३) उपचारांदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. याबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकेश गांगुर्डे व जालिंदर मधुकर वाघ हे दुचाकीवरून चिंचखेड रोडच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना सोमवारी ( दि.२२) रात्री दहा वाजेच्या सुमारास पाटाजवळ दुचाकी अचानक स्लिप झाल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या जालिंदर वाघ यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांदरम्यान जालिंदर वाघ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पिंपळगाव शहर नाभिक बांधवांनी हळहळ व्यक्त केली. याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रमोद देवरे अधिक तपास करत आहेत.