खोपडी शिवारात कार-दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 19:23 IST2019-05-21T19:23:07+5:302019-05-21T19:23:19+5:30
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात भरधाव कारने दुचाकीला धडक देऊन केलेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१९) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

खोपडी शिवारात कार-दुचाकी अपघातात एक ठार
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर खोपडी शिवारात भरधाव कारने दुचाकीला धडक देऊन केलेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१९) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
सुनील रमेश सातपुते (४५) व रविंद्र भालेराव दोघेही रा. सिन्नर हे (एमएच १५ एएम ९८७०) वरून सिन्नरकडे येत असताना खोपडी शिवारात दत्त मंदिर परिसरात शिर्डीच्या दिशेने भरधाव जाणाच्या कार (क्र . एमएच १५ जीपी ९३६५) ने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सुनील सातपुते यांचा गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. भालेराव यांना सिन्नरला खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार रमेश सदगीर तपास करीत आहेत.