मलढोणला एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:40 IST2019-06-06T23:40:03+5:302019-06-06T23:40:18+5:30
सिन्नर : विहिरीचे खोदकाम करण्यासाठी विहिरीत उतरत असताना क्रेनची ट्रॉली निसटून विहिरीत कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मलढोण शिवारात गुरुवारी (६) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.

मलढोणला एक ठार, दोन जखमी
सिन्नर : विहिरीचे खोदकाम करण्यासाठी विहिरीत उतरत असताना क्रेनची ट्रॉली निसटून विहिरीत कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मलढोण शिवारात गुरुवारी (६) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.
यात विश्वास प्रल्हाद दुबे (३५), विठ्ठल ज्ञानदेव दुबे (३३) व मच्छिंद्र सखाहरी सुंबे (४०) हे तिघे बसलेले होते. क्रेनची ट्रॉली खाली जात असताना सदर अपघात होऊन त्यात विश्वास प्रल्हाद दुबे (३३) या युवकाचा मृत्यू झाला, तर विहीरमालक विठ्ठल दुबे व मच्छिंद्र सुंभे हे जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांनी विहिरीतून तिघांना बाहेर काढून सिन्नरच्या खासगी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी विश्वास दुबे यास मृत घोषित केले. मच्छिंद्र
सुंभे गंभीर जखमी असल्याने त्यास नाशिक येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले तर विठ्ठल दुबे यांच्यावर सिन्नरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिन्नर नगर परिषदेच्या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयत विश्वास दुबे याच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. क्रेनचा गिअर नादुरुस्त होऊन रोप तुटलामलढोण शिवारात विठ्ठल ज्ञानदेव दुबे यांच्या विहिरीचे सुमारे ६० फूट खोल विहिरीचे काम झाले आहे. गुरुवारी दुपारी मजुरांनी जेवण करून पुन्हा कामास प्रारंभ करण्यासाठी क्रेनच्या ट्रॉलीत बसले.
क्रेनची ट्रॉली विहिरीत जात असताना क्रेनचा गिअर नादुरुस्त होऊन रोप सुटून ट्रॉली विहिरीत कोसळल्याचे सांगण्यात येते. यावेळी मोठा
आवाज झाला.