वेगवेगळ्या अपघातात एक ठार, तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:44 IST2018-03-08T01:44:12+5:302018-03-08T01:44:12+5:30
त्र्यंबकेश्वर : येथे समोरून येणाºया वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने रेनॉल्ट कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. दुसºया अपघातात गणपत बारीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण ठार झाला.

वेगवेगळ्या अपघातात एक ठार, तिघे जखमी
त्र्यंबकेश्वर : येथे समोरून येणाºया वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने रेनॉल्ट कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. दुसºया अपघातात गणपत बारीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण ठार झाला.
रात्री ८ वाजेच्या सुमारास रेनॉल्ट क्विड (क्र. एमएच ०४ एचयू १६०४) व नाशिककडे जाणाºया टाटा सफारी (क्र. एमएच १५ ईएक्स ४४०९) यांच्यात समोरासमोर धडक होऊन रेनॉल्ट कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. रेनॉल्ट कारमधील वर्षा शंकर सूर्यवंशी (२९), रुद्रप्रताप सूर्यवंशी (५) व चालक शंकर सूर्यवंशी जखमी झाले. जखमींवर नाशिक येथे हलविण्यात आले.
दुसरा अपघात जव्हार रस्त्यावर गणपत बारीजवळ पहाटे ४ च्या सुमारास झाला. या अपघातात सुनील पुंडलिक निंबारे (२२) रा. सातपूर यास अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तो ठार झाला.