येवल्यात अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 18:18 IST2018-10-12T18:18:13+5:302018-10-12T18:18:40+5:30
खामगाव पाटी जवळ येवला वैजापूर सीमेलगत झालेल्या अपघातात एक ठार झाला आहे. नाशिक हून औरंगाबाद कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इिर्टगा गाडी (क्र मांक एम. एच.३८ व्हि.०५५७) ने वैजापूर हून येवल्याकडे येणारे मोटारसायकलस्वार (गाडी क्र मांक एम.एच. ०२ ए.ए ४३७९) सुकदेव सखाहरी सोमासे (६५) यांना जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाले.

येवल्यात अपघातात एक ठार
येवला : खामगाव पाटी जवळ येवला वैजापूर सीमेलगत झालेल्या अपघातात एक ठार झाला आहे. नाशिक हून औरंगाबाद कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इिर्टगा गाडी (क्र मांक एम. एच.३८ व्हि.०५५७) ने वैजापूर हून येवल्याकडे येणारे मोटारसायकलस्वार (गाडी क्र मांक एम.एच. ०२ ए.ए ४३७९) सुकदेव सखाहरी सोमासे (६५) यांना जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाले.
अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे.धडक इतकी जोरात होती की मोटार सायकल२००फूट दूर फेकली गेली व इर्तिगा गाडी रस्त्याच्या कडेला नालीत फेकली गेली. मोटार सायकल स्वार हे डोंगरगाव तालुका येवला येथील शेतकरी होते.काही कामानिमित्त
ते वैजापूर येथे गेले होते.येवला ग्रामीण रु ग्णालयात शव विच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरणात डोंगरगाव येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.येवला तालुका पोलिसांनी कार चालकाविरु द्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.