राहुड घाटात अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 01:19 IST2021-05-24T01:18:46+5:302021-05-24T01:19:35+5:30
मुंबई - आग्रारोडवर रविवारी (दि.२३) दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास मुंबईकडून मालेगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पुढे जाणाऱ्या मोटारसायकलला (क्र. एमएच ०४ डीडब्ल्यू ३१४०) मागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील राजू पंढरीनाथ मोरे (५४, रा. वरणगाव, भुसावळ) यांचा मृत्यू झाला.

राहुड घाटात अपघातात एक ठार
चांदवड : मुंबई - आग्रारोडवर रविवारी (दि.२३) दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास मुंबईकडून मालेगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने पुढे जाणाऱ्या मोटारसायकलला (क्र. एमएच ०४ डीडब्ल्यू ३१४०) मागून धडक दिल्याने मोटारसायकलवरील राजू पंढरीनाथ मोरे (५४, रा. वरणगाव, भुसावळ) यांचा मृत्यू झाला.
याबाबत ईश्वर राजू मोरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी. एन. वाळेकर करीत आहेत. राहुड घाटात वारंवार अपघात होत असतात. त्याबाबत योग्य ती उपाययोजना पोलीस खात्याने करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.