पिंपळगावला अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:04 IST2020-03-19T23:18:00+5:302020-03-20T00:04:35+5:30
रानमळा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.१९) घडली.

पिंपळगावला अपघातात एक ठार
पिंपळगाव बसवंत : परिसरातील रानमळा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअपने जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.१९) घडली.
पालखेड येथील आयन शाकिर शेख मुलानी (२४) हा त्याची बहीण मासुम शाकिर शेख मुलानी हिच्यासोबत पालखेड येथून दुचाकीने पिंपळगावच्या दिशेने जात होते. मात्र, पिंपळगाव येथून भरधाव वेगाने येत असलेल्या पीकअप (एम एच १५ बीजे ९१२३) ने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात आयन याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची बहीण मासुम गंभीर जखमी झाली असून तिला खासगी रु ग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, अपघातात मयत आयन याचा मोठा भाऊ फिरोजदेखील गाडीवरून पडल्याने त्यास खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते.