झोडगे जवळ अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:35 IST2019-02-10T00:34:00+5:302019-02-10T00:35:12+5:30
मुंबई- आग्रा महामार्गावर झोडगे शिवारात रस्ता ओलांडणाऱ्या कैलास सोमा सोनवणे (४५) रा. एकलव्यनगर झोडगे यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यु झाला. या प्रकरणी विश्वास ओंकार सोनवणे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

झोडगे जवळ अपघातात एक ठार
मालेगाव : मुंबई- आग्रा महामार्गावर झोडगे शिवारात रस्ता ओलांडणाऱ्या कैलास सोमा सोनवणे (४५) रा. एकलव्यनगर झोडगे यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यु झाला. या प्रकरणी विश्वास ओंकार सोनवणे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.
राजमाने शिवारात दुचाकींची धडक
मालेगाव : महामार्गावरील झोडगे ते राजमाने रस्त्यावर दोघा दुचाकींची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वाराचा मृत्यु झाला आहे तर पाठीमागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी शिवदास भटु पवार रा. राजमाने यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकी (क्र. एम.एच.४१. के. ५८२६) वरील चालक (नाव माहित नाही) याने झोडगेकडे राजमानेकडे जात असताना विरोधी बाजुने जाऊन दुचाकी (क्र. एम.एच.२०. बी. आर. ९०१८) हिला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार लालाचंद अंबर पवार यांचा मृत्यु झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या सकुबाई विठोबा राठोड या गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार राजपूत हे करीत आहेत.