शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

शंभर टक्के उपस्थितीने कर्मचाऱ्यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 10:03 PM

नाशिक : लॉकडाउन नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये काम करणाºया सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात आल्याने कर्मचाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत फिजिकल डिस्टन्स नियमाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत काहीकाळ काम बंद ठेवले.

नाशिक : लॉकडाउन नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर एसटी महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये काम करणाºया सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात आल्याने कर्मचाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत फिजिकल डिस्टन्स नियमाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत काहीकाळ काम बंद ठेवले. वर्कशॉपमध्ये पाणीच नसल्याने सर्व कर्मचाºयांना बोलाविण्यात आल्याचा जाब कर्मचाºयांनी अधिकाºयांना विचारला.राज्य परिवहन महामंडळाचे कामकाज टप्प्याटप्प्याने सुरू होत असून, मंगळवारी (दि.२) पेठरोडवरील एसटीच्या वर्कशॉपमध्ये काम करीत असलेल्या सर्वच्या सर्व २०० कर्मचाºयांना कामावर बोलाविण्यात आले होते. सर्व कर्मचारी कामावर हजर झाल्याने या कर्मचाºयांनी अधिकाºयांच्या या भूमिकेला तीव्र आक्षेप घेत १०० टक्के उपस्थितीमुळे फिजिकल डिस्टन्स नियमाचे पालन करणे कठीण होणार असल्याचेसांगत कर्मचाºयांना सुरक्षिततेचेपुरेसे साधने देण्यात आली नसल्याबाबतही आक्षेप घेतला.सरकारने लॉकडाउन नियमावलीमध्ये बºयापैकी शिथिलता दिल्याने कामकाज हळूहळू सुरू होणार आहे. मात्र महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये काम करणाºया सर्वच कर्मचाºयांना एकाचवेळी कामावर बोलाविल्याने कर्मचाºयांनीअधिकाºयांना जाब विचारला. कर्मचाºयांना हात धुण्यासाठी पाणीच नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याकडे अधिकाºयांचे लक्ष वेधले. यावेळी अधिकाºयांनी तत्काळ टॅँकरची व्यवस्था करीत पाणी मागविले. परंतु ही व्यवस्था तात्पुरती असून, स्वच्छतेसाठी पाणी अधिक प्रमाणात अपेक्षित असल्याने त्याची तजवीज अगोदरच करणे अपेक्षित होते, असे म्हणत नाराजी व्यक्त केली.कर्मचाºयांना पुरेसा मास्क तसेच सॅनिटायझर नसल्याने कर्मचाºयांच्या आरोग्याकडे महामंडळाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीतकर्मचाºयांनी काम करण्यास विरोध केला.--------------------------------------कर्मचारी येणार कसे?एसटी महामंडळाचे कर्मचारी हे शक्यतो महामंडळाच्या बसमधूनच कामावर येत असतात. सध्या बसेस बंद असल्याने कामावर येणार कसे, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे सर्वच कर्मचाºयांना कामावर न बोलाविता शासनाच्या नियमाप्रमाणे ३५ टक्के कर्मचारी कामावर बोलाविण्याची मागणी त्यांनी केली.कर्मचाºयांना कामावर येण्यासाठी अधिकाºयांना त्यांची मनधरणी करावी लागली. कामावर न येणाºया कर्मचाºयांचे वेतन कपात करण्याचा इशारादेखील देण्यात आल्याने कर्मचाºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.----------------------------लॉकडाउन नियम शिथिल झाल्याने फॅक्टरी नियमाप्रमाणे कर्मचाºयांना कामावर बोलविण्यात आले आहे. एसटीची सेवा अत्यावश्यक सेवेमध्ये असल्याने या सेवेतील कर्मचाºयांना हजर राहणे क्रमप्राप्त ठरते. खासगी, सरकारी कार्यालयांचा नियम येथे लागू पडत नाही. महामंडळाच्या आदेशाने कर्मचाºयांना कामावर बोलविण्यात आले आहे.- मुकुंद कुंवर, उपयंत्र अभियंता, विभागीय कार्यशाळा

 

टॅग्स :Nashikनाशिक