मेळा बसस्टॅडजवळ जातीवाचक शिवीगाळ करून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 14:32 IST2018-10-20T14:31:42+5:302018-10-20T14:32:13+5:30
नाशिक : सीबीएसजवळील मेळा स्टॅण्डच्या पत्र्याजवळ एकास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे़

मेळा बसस्टॅडजवळ जातीवाचक शिवीगाळ करून एकास मारहाण
ठळक मुद्देसीबीएसजवळील मेळा स्टॅण्ड ; सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक : सीबीएसजवळील मेळा स्टॅण्डच्या पत्र्याजवळ एकास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी फाट्यावरील तेजल क्लासिकमधील रहिवासी प्रविण देढे हे मंगळवारी (दि़१६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेळा बस स्टॅण्ड पत्र्याच्या शेडजवळ उभे असताना संशयित केशव बोरस्ते (रा़ मिग साकुरे, ता़निफाड) याने जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच मारहाण करून निघून गेला़
या प्रकरणी देढे यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित बोरस्ते विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़