One drowned in a dam | बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू

बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू

लासलगाव : वालदेवीची सहा जणांचा जीव गेल्याची घटना ताजी असताना खडक माळेगाव बंधाऱ्यात एकाला जीव गमवावा लागल्याची घटना घडली.  खडक माळेगाव येथील बंधाऱ्यात सागर शरद शेजवळ पोहण्यासाठी  उतरला होता. या युवकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. काहींनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यांना अपयश आले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी डाॅ.अनिल बोराडे, विलास चव्हाणके, संदीप अग्रवाल, दत्ता  साप्ते यांनी  प्रयत्न केले. 

Web Title: One drowned in a dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.