शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियानासाठी एक कोटी

By admin | Updated: April 9, 2015 00:28 IST

सिद्धिविनायक न्यासची देणगी : सकारात्मक प्रतिसादाने अभियान यशस्वी होण्याची अपेक्षा

नाशिक : जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानासाठी मुंबई येथील श्री सिद्धिविनायक गणपती न्यासाच्या वतीने एक कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या हस्ते धनादेश स्वीकारला. यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर, जिल्हा कृषी अधीक्षक टी. एन. जगताप व न्यासाचे विश्वस्त हरिश सनस उपस्थित होते.यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी पालवे यांनी संस्था आणि उद्योजकांच्या सकारात्मक प्रतिसादाने अभियान यशस्वी होईल. न्यासाने दिलेल्या निधीतून अभियानाच्या अंमलबजावणीसाठी निवडलेल्या गावात कामे केली जातील, तर त्या गावांना भेट देऊन संस्थादेखील तेथील प्रगत कामांची पाहणी करू शकेल. जिल्ह्यात अभियानासाठी शिर्डी संस्थानने एक कोटी रुपये सहाय्य करेल, तर कोकाकोला कंपनीने १ कोटी ४0 लाख रुपयांची कामे वॉटर संस्थेमार्फत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असे सांगितले. न्यासाचे अध्यक्ष राणे यांनी राज्यातील ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी एक कोटी असे ३४ कोटी रुपये अभियानासाठी देण्यात येतील, असे सांगितले. या माध्यमातून राज्यातील गावे टंचाईमुक्त करण्यास मदत होईल, असे सांगितले.उपजिल्हाधिकारी गाडीलकर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कामांसाठी ३६८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगून यावर्षी एप्रिल ते जून या कालावधीत ५८ कोटी रुपये, तर जूनपासून मार्चपर्यंत १0२ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. यामध्ये सीमेंट बंधारे, शेततळे, वनीकरण व पाणलोटसंबंधी कामे केली जातील, असेही गाडीकर यावेळी म्हणाले. राज्य शासनाने येत्या ५ वर्षांत २५हजार गावे टंचाईमुक्त करण्यासाठी दरवर्षी ५ हजार गावांमध्ये शासनाने विविध विभागांच्या माध्यमातून विविध कामे हाती घेतली आहेत. शासनाने स्वयंसेवी संस्था, खासगी उद्योजक आदिंना अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हा प्रतिसाद मिळाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.