पिंपळगाव बसवंत येथे एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 18:13 IST2019-07-23T18:13:11+5:302019-07-23T18:13:37+5:30
पिंपळगाव बसवंत शहरातील रामदास वामन पालवे (४८) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पिंपळगाव बसवंत येथे एकाची आत्महत्या
पिंपळगाव बसवंत : शहरातील दगूनाना मोरेनगर परिसरातील रामदास वामन पालवे (४८) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली.
पिंपळगाव शहरातील दगूनाना मोरेनगर परिसरात राहणाऱ्या चालक म्हणून काम करणाºया रामदास वामन पालवे यांनी आपल्या राहत्या घरी खिळ्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पिंपळगाव बसवंत प्राथमिक रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रमोद देवरे करीत आहे.