बलात्कारप्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:25 AM2018-02-11T01:25:57+5:302018-02-11T01:25:57+5:30
नाशिक : प्रगतीनगरमध्ये पीडित युवतीसोबत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्तापित करत लग्नाचे आमिष दाखविल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रताप नारायण कंक यास अटक केली आहे.
![One arrested for rape | बलात्कारप्रकरणी एकास अटक One arrested for rape | बलात्कारप्रकरणी एकास अटक](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/default-image_201704447.jpg)
बलात्कारप्रकरणी एकास अटक
नाशिक : म्हसरूळ शिवारातील बोरगड परिसरात प्रगतीनगरमध्ये राहत्या घरी पीडित युवतीसोबत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्तापित करत लग्नाचे आमिष दाखविल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित प्रताप नारायण कंक (२३, प्रगतीनगर) यास अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित प्रताप याने जानेवारी २०१७ ते मे २०१७दरम्यान पीडित युवतीसोबत वारंवार इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध निर्माण केले. यासाठी त्याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. संशयिताने पीडित युवतीच्या राहत्या घरी जेव्हा कोणी घरात नसताना तिच्यासोबत शरीरसंबंध केल्याचे फिर्यादित पीडित मुलीने म्हटले आहे.
याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी संशयितास अटक करून त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. के. सावळा करीत आहेत.