ठेका देण्याचे आमिष दाखवत महिलांची फसवणूक , एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 16:13 IST2020-06-19T16:13:15+5:302020-06-19T16:13:31+5:30
दिंडोरी : ३७ हजार रुपये लाटले

ठेका देण्याचे आमिष दाखवत महिलांची फसवणूक , एकास अटक
वणी : आॅटोमोबाईल कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे सांगून कंपनीत पापड पुरविण्याचा ठेका व डबे लावण्याचे अमिष दाखवत दोन महिलांची ३७ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भामट्यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमलता सुनिल जमधडे (वय ४४) रा. पाथर्डीरोड, सदिच्छा नगर, नाशिक यांचा फळे व कापड विक्र ी चा व्यवसाय आहे. त्यांच्या संपर्कात राजु रामचंद्र भामरे (वय ५५) हा इसम आला. आपण आॅटोमोबाईल कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे सांगत त्याने कंपनीत पापड पुरविण्याचा ठेका द्यावयाचा आहे तसेच सोनी राजकुमार गुप्ता यांना कंपनीत डबे लागतील असे अमिष जमधडे यांना दाखवले. त्याने त्याबाबत बाँड करावा लागेल असे सांगून दोन महिलांकडून अनुक्र मे १७ व २० हजार रु पये दिंडोरी येथे घेतले. एकुण ३७ हजार रुपये घेऊनही त्याने पुढे काहीही हालचाल केली नाही. भामरे याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना या महिलांची झाली आणि त्यांनी ही माहिती आपल्या परिचित वकीलाला दिली. त्यानंतर दिंडोरी येथे त्याला बोलावून पोलिसांच्या हवाली केले. सदर महिलांच्या तक्रारीवरुन राजू भामरे याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.