दीड हजार प्रवासी रेल्वेने रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 00:06 IST2020-05-16T00:06:09+5:302020-05-16T00:06:26+5:30

नाशिकरोड रेल्वेस्थानकातून शुक्र वारी रात्री ८ वाजता दीड हजार उत्तर भारतीय श्रमिक रेल्वेने रवाना झाले.

One and a half thousand passengers left by train | दीड हजार प्रवासी रेल्वेने रवाना

दीड हजार प्रवासी रेल्वेने रवाना

नाशिकरोड : नाशिकरोडरेल्वेस्थानकातून शुक्र वारी रात्री ८ वाजता दीड हजार उत्तर भारतीय श्रमिक रेल्वेने रवाना झाले. उत्तर प्रदेश शासनाने ज्या नाशिक जिल्ह्यातील उत्तर भारतीय कामगारांना ना हरकत दाखला दिला होता, त्यांनाच या श्रमिक रेल्वेने पाठविण्यात आले. जिल्हा प्रशासन व तहसीलदारांकडे उत्तर प्रदेशला घरी जाण्यासाठी ज्या उत्तर भारतीय कामगारांनी आॅनलाइन अर्ज करून परवानगी मागितली होती. त्यांनाच नियमानुसार या श्रमिक रेल्वेने जाऊन देण्यात आले. नाशिकमधून ही चौथी श्रमिक रेल्वे धावली. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशला प्रत्येकी दोन ट्रेनचा त्यात समावेश होता.

Web Title: One and a half thousand passengers left by train