दीड लाख बालकांना पाजला पोलिओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 12:36 AM2020-01-20T00:36:40+5:302020-01-20T00:37:08+5:30

राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत नाशिक महापालिका क्षेत्रात सुमारे दीड लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला असून, उर्वरित चार लाख बालकापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे.

One and a half million children receive polio dose | दीड लाख बालकांना पाजला पोलिओ डोस

महापालिका केंद्रावर बालकास डोस पाजणाऱ्या आरोग्य कर्मचारी.

googlenewsNext
ठळक मुद्देचार लाख अजूनही प्रलंबित : आजपासून घरोघरी जाऊन लसीकरण

नाशिक : राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत नाशिक महापालिका क्षेत्रात सुमारे दीड लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला असून, उर्वरित चार लाख बालकापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात शहरातील पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन मनपा आयुक्त राधाकृष्णा गमे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्याक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, पूर्व प्रभाग सभापती सुमन भालेराव, आरोग्य वैद्यकीय समिती सभापती दीपाली कुलकर्णी, नगरसेविका समिना मेनन, साबळे, अर्चना थोरात उपस्थित होते. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील १ लाख ९३ हजार २०२ लाभार्थ्यांपैकी १ लाख ५० हजार २४४ बालकांना डोस पाजण्यात आला. सदर कार्यक्र मास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते, माताबाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंके, डॉ. झाकीर हुसेन रु ग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उर्वरित बालकांना दिनांक २० ते २४ जानेवारी दरम्यान घरोघरी जाऊन कर्मचारी पोलिओ लस देणार आहेत.

केंद्रनिहाय लसीकरण
शहरी आरोग्य सेवा केंद्र सातपूर-४११८ संजीवनगर-५०३७, आर.सी.एच. केंद्र गंगापूर-७३५५, एमएचबी कॉलनी-५२३४ सिडको-४७१० अंबड-५११२ मोरवाडी-४८७५ कामटवाडे-४६४९ पवननगर-५५०२, पिंपळगावखांब-७५७३, नाशिकरोड-४७११ विहितगाव-३४५९, सिन्नरफाटा-३३३१, गोरेवाडी-३२४१, दसकपंचक-४९७४, उपनगर-४६९९, संगमा-७३३१, बजरंगवाडी - ५२५५, भारतनगर-५२७०, जिजामाता-३५३३, मुलतानपुरा-४५४८ शासकीय रु ग्णालय-८४८९, रामवाडी-३५१३, रेडक्र ास-३६५२ मायको पंचवटी-४११८, म्हसरूळ-५३४९, मखमलाबाद-५१५७, तपोवन-४३१६, हिरावाडी-४७८७.

Web Title: One and a half million children receive polio dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य