दीड लाख नागरिक हाय रिस्क झोनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:14 IST2020-09-28T22:11:36+5:302020-09-29T01:14:24+5:30

नाशिक: शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाचा दुसरीकडे अनेक नागरीक हे बाधीतांच्या संपर्कात आल्याने ते पॉझीटीव्ह होत असल्याचे म्हणजे संसर्ग वाढला होता असे महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळले आहे. एकुण साडेतीन लाख नागरिक कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले यात १ लाख ४८ हजार ८३६ 'हाय रिस्क' तर १लाख ९९ हजार ५२६ नागरीक हे ह्यलो रिस्क' मध्ये असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. यातील बहुतांशी व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून गरजेनुसार काहींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

One and a half lakh citizens in high risk zones | दीड लाख नागरिक हाय रिस्क झोनमध्ये

दीड लाख नागरिक हाय रिस्क झोनमध्ये

ठळक मुद्देमनपाचे सर्वेक्षण: साडे तीन लाखनागरीक आले बाधीतांच्या संपर्कात

नाशिक: शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाचा दुसरीकडे अनेक नागरीक हे बाधीतांच्या संपर्कात आल्याने ते पॉझीटीव्ह होत असल्याचे म्हणजे संसर्ग वाढला होता असे महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळले आहे. एकुण
साडेतीन लाख नागरिक कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले यात १ लाख ४८ हजार ८३६ 'हाय रिस्क' तर १लाख ९९ हजार ५२६ नागरीक हे ह्यलो रिस्क' मध्ये असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. यातील बहुतांशी व्यक्तींची तपासणी
करण्यात आली असून गरजेनुसार काहींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. ६ एप्रिल रोजी शहरात पहिला कोरोना बाधीत रूग्ण गोविंद नगर परीसरात आढळला होता. त्यानंतर जून पर्यंंत संख्या मयार्दीत होती. नंतर मात्र जुलै आॅगस्ट महिन्यांत उद्रेक झाला आणि दिवसाकाठी सातशे ते आठशे रूग्ण आढळत आहेत त्या पाश्वर्भूमीवर महापालिकेने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात साडे तीन लाख नागरीक हे बाधीताच्या संपर्कात आले असल्याचे आढळले होते.
कोरोनाबाधित आढळल्यानंतर बाधित राहत असलेल्या घराला किंवा त्याच्या घराच्या परीसरातील भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर केला जातो. त्यानंतर या क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे सर्वेक्षण मनपाच्या आरोग्य पथकांमार्फत करण्यात येते. शहरात आतापर्यंत १० हजार ३८९ इमारती वा परिसर महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत.
या क्षेत्रात करण्यात आलेल्या सर्र्वेक्षणानुसार १ लाख ९९ हजार ५२६ नागरीक लो रिस्क तर १ लाख ४८ हजार ८३८ नागरीक हाय रिस्क मध्ये असल्याचे आढळून आले. गरजेनुसार या नागरीकांवर तातडीने उपचार करण्यात आले काहींना रूग्णालयात दाखल करण्याची शिफारस देखील करण्यात आले आहेत. शहरात सध्या २०७६ प्रतिबंधित क्षेत्रे घोषित आहेत तर असून १ हजार २८९ वैद्यकीय पथकांमार्फत घर सर्वेक्षण सुरू आहे.

पावणे दोन लाख नागरिकांची चाचणी
महापालिकेच्या वतीने शहरात १ लाख ८५ हजार ५८१ संशयित नागरीकांची चाचणी करण्यात आली आहे. यात ४९ हजार ५०४ जणांना कोरोना संसर्गित आढळले आहेत. तर १ लाख ४१ हजार २५५ जण निगेटिव्ह आढळले आहेत. बाधितांपैकी ४५ हजार ७४९ जण हे उपचाराअंती पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

 

Web Title: One and a half lakh citizens in high risk zones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.