नाशिक : पंचवटीतील हिरावाडी भागात ठाकरे मळ्यात घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे सोने चांंदीचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली असून या प्रकरणात मंदाबाई सोपान ठाकरे (६५, ठाकरे मळा) यांच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा बुधवारी (दि. २३) चोरट्यांनी तोडला. दरवाजाचे कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील २५ ग्रॅमची सोन्याची पोत, ३ ग्रॅमची सोन्याचे डोरले, चार ग्रॅमची सोन्याची अंगठी, सहा ग्रॅमची सोन्याची चेन असा १ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाकरे मळ्यात घरफोडीत दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 01:49 IST