एकदरे शिवारात आढळला तरस मृतावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:50 IST2020-12-16T19:58:02+5:302020-12-17T00:50:12+5:30
पेठ : तालुक्यातील एकदरे येथील भावडू जोगारे या शेतकऱ्याच्या शेतात तरसाचा मृतदेह आढळून आला.

एकदरे शिवारात आढळला तरस मृतावस्थेत
बुधवारी सकाळी नागरिकांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पेठच्या वनविभागाला दूरध्वनीवरून माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पेठ येथील कार्यालयात पशुवैद्यकीय अधिकारी चंद्रकांत लहामटे यांनी शवविच्छेदन करून त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत तरसाच्या तोंडावर जखम असल्याचे दिसून आले असले तरी मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही. यावेळी वनपाल सुनील टोंगारे, युवराज गवळी, मझहर शेख यांच्यासह वनरक्षक उपस्थित होते.