ट्रकच्या धडकेत वृद्ध महिला जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:50 IST2018-08-21T00:48:51+5:302018-08-21T00:50:06+5:30

ट्रकच्या धडकेत वृद्ध महिला जागीच ठार
नाशिकरोड : सावरकर उड्डाण पुलावर दुचाकीला आयशर ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने वयोवृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. सामनगावरोड, गाडेकर मळा येथील संजय दत्तात्रय वलवे हे सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून आई लक्ष्मीबाई दत्तात्रय वलवे (६५) यांना दुचाकीवरून दत्तमंदिर सिग्नलकडून स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरून सिन्नर फाट्याच्या दिशेने जात होते. नवले चाळच्या वरती उड्डाण पुलावर पाठीमागून भरधाव आलेला आयशर ट्रकने दुचाकीला रॉँग साइडने ओव्हरटेक करताना दुचाकीला धक्का लागल्याने गाडी स्लीप झाली. यामध्ये लक्ष्मीबाई रस्त्यावर खाली पडल्याने ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या. अपघातानंतर आयशर ट्रकचालक न थांबता पळून गेला आहे. अपघातामुळे उड्डाण पुलावरून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.