शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
4
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
5
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
6
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
7
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
8
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
9
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
10
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
11
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
12
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
13
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
14
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
15
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
16
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
17
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
18
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
19
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान

तांबट गल्ली : लाकडी वाड्यामध्ये उडाला आगीचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 16:50 IST

जुनी तांबट गल्लीमध्ये सुनील जगदाने यांच्या मालकीच्या वापरात नसलेला जुना लाकडी वाडा आहे. या लाकडी वाड्यामध्ये अचानकपणे दुपारी आग लागली. आगीचे निश्चित कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नव्हते; मात्र यापुर्वीही दोन ते तीन वेळा या वाड्यामध्ये अशाचप्रकारे आग धुमसली होती

ठळक मुद्देअग्नीशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे मोठा धोका टळलाआगीचे निश्चित कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते...अर्ध्या तासात मिळविले आगीवर नियंत्रण

नाशिक : अत्यंत दाट लोकवस्ती आणि जुन्या नाशकातील गावठाण भाग असलेल्या जुन्या तांबट गल्लीतील एका बंद लाकडी जुन्या वाड्याला गुरुवारी (दि.४) दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानकपणे आग भडकली. बंद वाड्याच्या खिडकीमधून आगीच्या ज्वाला अन‌् धूराचे लोट बाहेर येऊ लागल्याचे दिसताच आजुबाजुच्या रहिवाशांनी अग्नीशमन दलाला घटनेची माहिती दिली. विविध अडथळ्यांची शर्यत पार करत अग्नीशमनच्या बंबासह जवान अवघ्या काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.

जुने नाशिक या भागात आपत्कालीन परिस्थिती जेव्हा उद‌्भवते तेव्हा, या परिस्थितीचा सामना करताना विविध अडथळ्यांवर बचाव पथकाच्या जवनांना अगोदर मात करावी लागते. त्याचा प्रत्यय गुरुवारीही आला. जुनी तांबट गल्लीमध्ये सुनील जगदाने यांच्या मालकीच्या वापरात नसलेला जुना लाकडी वाडा आहे. या लाकडी वाड्यामध्ये अचानकपणे दुपारी आग लागली. आगीचे निश्चित कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नव्हते; मात्र यापुर्वीही दोन ते तीन वेळा या वाड्यामध्ये अशाचप्रकारे आग धुमसली होती, अशी माहिती अग्नीशमन दलाच्या जवानांनी दिली. दुपारी आग लागल्याचा ह्यकॉलह्ण शिंगाडा तलाव येथील मुख्य अग्नीशमन दलाच्या मुख्यलयात आला. माहिती मिळताच जवानांनी कौशल्य आणि पुर्वानुभव लक्षात घेता अरुंद गल्लीबोळ आणि दाट लोकवस्तीमुळे ह्यदेवदूतह्ण या लहान बंबासह जवानांना तातडीने रवाना केले. अवघ्या काही मिनिटांतच सारडासर्कल, फाळकेरोड, दुधबाजार, शहीद अब्दुल हमीद चौकातून हा बंब घटनास्थळी पोहचला. यावेळी संपुर्ण वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला होता. वरील बाजूच्या खिडक्यांमधून बाहेर येणाऱ्या आगीच्या ज्वालांच्या दिशेने जवानांनी पाण्याचा मारा सुरु केला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दीही जमली होती.

..अर्ध्या तासात मिळविले आगीवर नियंत्रणआगीचे स्वरुप रौद्र असल्यामुळे तत्काळ अतिरिक्त मदत म्हणून दुसरा बाऊजर बंबासह जवानांनी कुमक घटनास्थळी बोलविण्यात आली. लिडिंग फायरमन इकबाल शेख, फारयमन राजेंद्र नाकील, तौसिफ शेख, भीमाशंकर खोडे, राजेंद्र पवार, शिवाजी फुगट, दिनेश लासुरे, अभिजीत देशमुख, अशोक सरोदे, जे.एस.अहिरे या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. कारण या वाड्याला लागूनच अन्य दुसरे वाडेही असल्यामुळे धोका मोठा होता. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलfireआगAccidentअपघातNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका