जुन्या नाशकात चार लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 01:26 IST2018-09-14T01:26:18+5:302018-09-14T01:26:55+5:30

जुने नाशिक परिसरात भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोगवाडा परिसरात एका अपार्टमेंटच्या सदनिकेत अवैधरीत्या गुटख्याचा मोठा साठा पोलिसांनी छापा मारून जप्त केला आहे. सुमारे चार लाख २८ हजारांचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला असून, संशयित रशिद शोएब शेख (४२) यास ताब्यात घेतले आहे.

In the old Nashik, the gutka of four lakh was seized | जुन्या नाशकात चार लाखांचा गुटखा जप्त

जुन्या नाशकात चार लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : जुने नाशिक परिसरात भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोगवाडा परिसरात एका अपार्टमेंटच्या सदनिकेत अवैधरीत्या गुटख्याचा मोठा साठा पोलिसांनी छापा मारून जप्त केला आहे. सुमारे चार लाख २८ हजारांचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला असून, संशयित रशिद शोएब शेख (४२) यास ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, जोगवाड्यामधील अलकमर सोसायटीत राहणाऱ्या शेख याने त्याच्या फ्लॅट क्रमांक ३ मध्ये अवैधरीत्या गुटख्याचा साठा ठेवल्याची गुप्त माहिती भद्रकाली पोलीस ठाण्याला मिळाली होती. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांच्या पथकासह अन्न, औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकाºयांनी छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४ लाख २८ हजारांचा गुटख्याचा साठा हस्तगत केला आहे. यामध्ये राज्यात विक्रीवर प्रतिबंध असलेला गुटखा, सुगंधी तंबाखूचा समावेश आहे.

Web Title: In the old Nashik, the gutka of four lakh was seized