आनंदनगरला वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 01:43 IST2021-12-31T01:42:32+5:302021-12-31T01:43:01+5:30
आनंदनगर येथे एका पादचारी वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी ओढून पलायन केल्याची घटना घडली.

आनंदनगरला वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावले
नाशिकरोड : आनंदनगर येथे एका पादचारी वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी ओढून पलायन केल्याची घटना घडली. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेण्याचे प्रमाण वाढू लागल्याने महिलावर्गात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. आनंदनगर येथे राहणाऱ्या वयोवृद्ध अलका अशोक जाधव (६३, रा. शिवनेरी सोसायटी) या बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घराजवळील रस्त्यावरून पायी एकट्या जात होत्या. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी जाधव यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे ७५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून तोडून चोरून नेले. मंगळसूत्र चोरताच जाधव यांनी आरडाओरड केली. परंतु चोरटे धूम स्टाईल पद्धतीने पळून गेले. सदरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.